तेर (प्रतिनिधी)-  संस्कारक्षम पिढी घडवण्यात तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाचे खूप मोठे योगदान आहे असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी केले.      

धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयामध्ये सन 1999- 2000 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी शितोळे बोलत होते. या मेळाव्याला सन 1999- 2000 या बॅचला शिकवणारे एस. बी.नाईकवाडी, ऐ. बी. लोमटे, बी. व्ही. अबदारे, बी. डी. चव्हाण, एन.आर.जेवे, एस. ऐ.पवार, एम.एम. जाधव, एम.आय.बागवान, एन.व्ही. भंडारे,  मुख्याध्यापक जे.के.बेदरे, पर्यवेक्षक एस.एस. पाटील, बी.डी.कांबळे, एस.एस. बळवंतराव आदी प्रमुख गुरुजनाची उपस्थिती होती. यावेळी एस. एस. बळवंतराव  यांनी सद्याची शाळेची प्रगती, वाटचाल याची माहिती दिली. या बॅचचे विद्यार्थी बालाजी कानडे, सचिन पाटील, प्रवीण चोरमले यांचा प्रातिनिधीक स्वरूपात यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण चोरमले यांनी केले. तर सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले. तर आभार मीरा पाटील यांनी मानले.

 
Top