धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर,उस्मानाबाद आणि परंडा या विधानसभा मतदारसंघातील 1523 मतदान केंद्रावर 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत 14 लक्ष 4 हजार 12 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातील 2612 मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

मतदान केल्याचा गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना मतदान कक्षात मोबाईल सोबत घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे उमरगा विधानसभा मतदारसंघातील 321, तुळजापूर मतदारसंघात 410, उस्मानाबाद मतदारसंघात विधानसभा मतदार 416 आणि परंडा विधानसभा मतदारसंघात 376 केंद्र असे एकूण 1523 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

नवीन मतदार नोंदणी तसेच दुरुस्ती व आवश्यक वगळणीअंती 29 ऑक्टोबर 2024 रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमरगा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 66 हजार 30 पुरुष,1 लक्ष 49 हजार 355 स्त्री व 9 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 15 हजार 394 मतदार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 1 हजार 25 पुरुष,1 लक्ष 82 हजार 45 स्त्री आणि 7 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 83 हजार 77 मतदार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 96 हजार 352 पुरुष,1 लक्ष 78 हजार 399 स्त्री आणि 17 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 74 हजार 768 मतदार आणि परंडा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 75 हजार 221 पुरुष,1 लक्ष 55 हजार 546 स्त्री आणि सहा तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 30 हजार 773 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये 7 लक्ष 38 हजार 628 पुरुष, 6 लक्ष 65 हजार 345 स्त्री आणि 39 तृतीयपंथी असे चारही मतदारसंघात 14 लक्ष 4 हजार 12 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्ह्यातील 85 वर्षावरील 3008 आणि दिव्यांग असलेले 583 असे एकूण 3591 मतदार हे 132 मतदान पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करणार आहे.


उमरगा विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील 613 आणि दिव्यांग 194 असे 807 मतदार 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 40 नियुक्त ग्रुप भेट मतदान पथकाच्या माध्यमातून विशेष गृहभेट पोस्टल मतपत्रिकेतून घरीच मतदान करणार आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 583 मतदार हे 85 वर्षावरील आणि 93 मतदार हे दिव्यांग असे एकूण सात 676 मतदार 9 ते 10 नोव्हेंबर दरम्यान गृहभेट मतदान पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करतील. 

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 1117 आणि दिव्यांग 169 एकूण 1286 मतदार हे 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान 25 गृह भेट मतदान पथकाच्या माध्यमातून मतदान करतील आणि परंडा विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील 695 मतदार आणि 127 दिव्यांग मतदार असे एकूण 822 मतदार हे 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 37 गृहभेट पथकाच्या माध्यमातून घरीच मतदान करणार आहे.

 
Top