तुळजापूर (प्रतिनिधी)- हमीभावाने खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी दि. 15/12/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहीती खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनिल जाधव यांनी दिली आहे.

या बाबतीत माहिती देताना चेअरमन सुनिल जाधव म्हणाले कि, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि.28/10/2024 रोजीच्या बैठकीतील

निर्णयानुसार हंगाम 2024-25 मधील हमीभावाने खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी दि. 15/11/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढ ही शासन पत्र दि. 13/11/2024 अन्वये दि. 30/11/2024 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. हंगाम 2024-25 मधील हमीभावाने सोयाबीन, मूग व उडीद खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी दि. 30/11/2024 पर्यंत देण्यात आलेली मुतदवाढ ही संदर्भिय शासन पत्र दि. 19/11/2024 अन्वये दि. 15/12/2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चेअरमन सुनिल जाधव यांनी केले आहे.

 
Top