धाराशिव (प्रतिनिधी) -  जिल्ह्यात अवैधरित्या धंदे वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात तर ते धंदे बोकाळले असल्यामुळे त्याला चाप लावण्यासाठी ठिकाणी छापेमारी करीत आहे. या दरम्यान पान मसाला, तंबाखू जर्दा, सुगंधीत, सुपारी पदार्थ तत्सम गुटखा असा एकूण 13 लाख 74 हजार 420 रुपये किंमतीचा माल मिळून आल्यामुळे जप्त करुन मिळून आलेला माल जप्त केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करत असताना जळकोट येथे आले असता पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इनोव्हा कार क्र एमएच 15 बी.एच 8888 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा विक्री करण्यासाठी वाहतूक करत आहे. ही कार जळकोट ते किलज रोडवरुन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून दि.15 नोव्हेंबर रोजी 12.40 वाजता नमूद कारचा पाठलाग करत सलगरा (दि.) येथे आले असता त्या ठिकाणी काही व्यक्ती कारमधून पान मसाला, तंबाखु जर्दा, सुगंधीत सुपारी पदार्थ तत्सम गुटखा घरात टाकत असताना मिळून आला. त्यावर पथकाने त्यास ताब्यात घेवून त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे शिवराज विश्वनाथ बोकडे, वय 39 वर्षे, रा.बेळंब ता. उमरगा, दादासाहेब बब्रुवान शिगंटे, रा. सलगरा (दि.) ता. तुळजापूर असे सागितले त्यावर पथकाने त्या ठिकाणाहून वाहन इनोव्हा कार क्र एमएच 15 बी.एच. 8888 सह पान मसाला, तंबाखू जर्दा, सुगंधीत, सुपारी पदार्थ तत्सम गुटखा असा एकूण 13 लाख 74 हजार 420 रुपये किंमतीचा माल मिळून आल्याने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी बोकडे व शिगटे यांना ताब्यात घेवून आरोपींच्या विरुध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुरनं 446/2024 भा.न्या. सं. कलम 223, 274, 275, 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक गिते हे करत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, चालक पोलीस अंमलदार तानाजी शिंदे यांच्या पथकाने केली.


 
Top