उमरगा (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून उमरगा व मुरूम बसस्थानकाच्या पुनर्बांधणी,  नूतनीकरणासाठी प्रत्येकी 5 कोटी रु. निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

उमरगा हे राष्ट्रीय महामार्गावरील शेवटचे व सीमावर्ती भागातील तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी शिक्षण व व्यापार यासाठी दररोज हजारो लोक येत असतात. यामुळे येथील बसस्थानकावर नेहमीच वर्दळ असते. परंतु येथील बसस्थानकाची सध्याची इमारत जीर्ण झाल्याने प्रवाशांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच मुरूम बसस्थानक हे संपूर्ण मोडकळीस आल्याने नागरिक, विद्यार्थी व विशेषतः महिलांची गैरसोय होत होती. 

या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही बसस्थानकाच्या पुनर्बांधणी व नुतणीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चौगुले यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले, तसेच याकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांचे आभार मानले आहेत.

 
Top