धाराशिव (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून नामनिर्देशन दाखल केले. मागील पाच वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा तुळजापूर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या व संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या सोबतीने यंदाही विजय आपलाच असेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 
Top