उमरगा (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळाला महत्व देणे आवश्यक आहे. मुलींनी स्वयंरक्षणासाठी लाठी- काठी सारखे खेळ खेळण्यासह मन प्रसन्न ठेवण्यासाठी  मोबाईलचा गैरवापर करू नये. वेळेवर उठणे, योग्य आहार व स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी व्यक्त केले. 

धुळे जिल्हयातील पिंपळनेर येथे 5वी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 5 व 6 आक्टोबर रोजी घेण्यात आली. या स्पर्धेतील डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूलच्या विजेते विद्यार्थ्यांचा गुरूवारी (ता.10) रोजी  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष महेश अंबर, लाठी असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला, प्रशिक्षक महंमदरफी शेख, प्राचार्या गंगा अंबर उपस्थित होते. 

 या स्पर्धेत एकम लाठी, द्वे लाठी, द्वे अनिख, पंच अनिख, काटक पवित्र, वयोगट 8 वर्षाखालील, 10 वर्षाखाली, 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, 18 वर्षाखालील  व 18 वर्षावरील या गटात मुलं व मुली यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून  तब्बल 16 जिल्ह्यातून दोनशे ते अडीचशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा धुळे जिल्हा लाठी असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आली. 

या स्पर्धेत डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूलच्या 20 विजेते खेळाडूंचा पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी  शिक्षक कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी दुर्गारांनी बिद्री, अंकिता पुजारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

 
Top