उमरगा (प्रतिनिधी)- नगर परिषदेस उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक अग्नीशमन वाहनाचे शुक्रवार दि.11 रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतुन “ महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान ” अंतर्गत उमरगा नगर परिषदेसाठी अग्निशमन केंद्राचे बांधकाम व अग्निशमन वाहन खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कोटी 71 लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून सदर वाहन उपलब्ध झालेले आहे.
यावेळी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, हरीश डावरे, शरद पाटील, शंकर पवार, युवा सेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शंकर पाटील, कार्यालयीन अधिक्षक तुळशीदास वऱ्हाडे, लेखापाल कृष्णा काळे, विद्युत अभियंताप्रसाद माळी, पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी, नगर अभियंता राजन वाघमारे, संगणक अभियंता महेश शिंदे, रचना सहाय्यक संदीप जाधव, स्वच्छता निरीक्षक विकास दणाणे, कर व प्रशासकीय अधिकारी विवेक शाहीर, माधव नागराळे, शेषेराव भोसले, व्यंकट क्षीरसागर, आदी उपस्थित होते.