धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय सहकार निबंधक, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकची उपविधी तयार करण्यासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा  येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली सभागृहात पार पडली.

बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, उपाध्यक्ष वैजीनाथ शिंदे, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके, सर्व कर्मचारी, बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी होत असलेल्या विशेष सर्वसाधारण सभेबद्दल माहिती सांगितली. नंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी बँकेच्या उपविधीमध्ये काय-काय बदल, दुरूस्ती केली. याची सविस्तर माहिती सांगितली. सभागसदांनी त्यास टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. बँकेचे संचालक विश्वास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.

 
Top