धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून हा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या, वाहने, मोटारसायकल यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने वापरता येणार नसल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी काढला आहे. 

जिल्हयातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून दहापेक्षा अधिक मोटारगाडया मोटारसायकल, वाहनाच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिला आहे. कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त मोटार गाडया, मोटारसायकल अथवा वाहने वापरण्यास या आदेशाव्दारे निर्बंध घालण्यात येत आहेत.

 
Top