धाराशिव (प्रतिनिधी)-जन सन्मान यात्रेची सुरुवात बारामतीत झाली होती. आज दि.30 सप्टेंबर रोजी सोमवारी लातूर जिल्ह्यातीलउदगीर शहरात जन सन्मान यात्रेची पदयात्रा झाली आहे. उदगीर शहरात जन सन्मान यात्रेची सभा झाली.
या जन सन्मान यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मराठवाडा शिक्षक आमदार आमदार विक्रम काळे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व धाराशिव जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जन सन्मान यात्रेसाठी महेंद्र धुरगुडे पक्षाचे पदाधिकारी व सहकारी यांच्या समवेत उपस्थित होते. या यात्रे दरम्यान धाराशिव जिल्ह्यामधील पक्षाची कामगिरी, सद्यस्थिती व पक्ष बांधणी बाबत अजित पवार यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी तुळजापूर मतदारसंघाबाबत अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तुळजापूर व धाराशिव कळंब मतदार संघ सोडवून घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. आपण तुळजापूर विधानसभा मतदार संघातून विधानसभेसाठी निवडणूक लढविण्याची इच्छा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी व्यक्त केली. तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी मागणी केली. याबाबत अजित पवार यांनी या मागणी विषयी पक्ष सकारात्मक असून याविषयी लवकरच पक्ष निर्णय घेईल असे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा जाहीर सत्कार केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, तुळजापूर सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष विनोद जाधव, तुळजापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.