धाराशिव (प्रतिनिधी)-  वकील नागरी पतसंस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 30 सप्टेंबर 24 रोजी शिवानंद फंक्शन हॉल धाराशिव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधीज्ञ बार अध्यक्ष ॲड. प्रसाद जोशी यांनी भूषविले. वकील नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड राजेंद्र धाराशिवकर   अहवाल सादर करून धाराशिव, उमरगा व भूम या शाखेंचा लेखाजोखा मांडला. संस्थेने यावर्षी 55 कोटीची उलाढाल केली असून 9 कोटीच्या ठेवी आहेत. सभासदांना विविध गरजा भागविण्यासाठी कर्ज वाटप केले आहे. संस्थेला ऑडिट वर्ग ए मिळाला आहे. संस्थेला यावर्षी 17 लाख नफा झाला असून अध्यक्षाने संचालक मंडळाने यावर्षी 12%  लाभांश देण्याचे ठरविले असून त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. यावेळी संस्थेचे संचालक ॲड. रामचंद्र गरड, ॲड पंडित नळेगावकर, ॲड. रमेश  वट्टे, ॲड. एस. के. बिराजदार, कार्यकारी संचालक माधुरी जाधव व वकील सभासद उपस्थित होते. सहकार प्रशिक्षक अधिकारी मधुकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top