मुरूम (प्रतिनिधी) - येथील भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. विजया बेलकेरी यांचा महाविद्यालयाच्या सभागृहात नियतवयोमानानुसार सेवापूर्ती सोहळा सोमवारी (ता. 30) रोजी पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तानाजी भाऊ फुगटे होते. यावेळी संस्थेचे संचालक रामभाऊ इंगोले, उमरगाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले, सेवानिवृत्त प्राचार्य दत्तात्रय इंगळे, प्रा. डॉ. महेश मोटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक किसन खंडागळे, प्रा. जीवन जाधव, भालकीचे सत्यसाई पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर यम्मे, सचिव ज्योती यम्मे, बिदरच्या डॉ. स्नेहा यम्मे, पुणेचे अनिल बेलकरी, अशोक बेलकेरी, रामशेट्टी बेलकेरी, वैजनाथ पंचगल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शुभांगी जाधव, सिमरन शेख, भाग्यश्री गवंडी, गौरी लाटे यांनी स्वागत गीत म्हटले. यावेळी संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते प्रा. विजया बेलकेरी व प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यां सपत्नीक पूर्ण आहेर देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय अस्वले, किसन खंडागळे, डॉ. महेश मोटे, वैजीनाथ पंचगल्ले, धनंजय बनजगोळे, जीवन जाधव, शमशाद मुजावर, लक्ष्मी चव्हाण, शुभांगी जाधव, शिफा पटेल आदींनी मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
सेवानिवृत्तीच्या सत्काराप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना मनात अनेक भावना असून जे सहकारी, मार्गदर्शक आणि वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या शैक्षणिक प्रवासात साथ दिली. संस्थेने मला काम करण्याची संधी दिली, त्यातून मी खूप काही शिकले आणि माझ्या जीवनात यशस्वी झाले. सेवानिवृत्ती म्हणजे एका प्रवासाची समाप्ती असली, तरी ती नव्या पर्वाची सुरुवातच आहे. मला या पुढेही खूप काही करण्याची इच्छा आहे. मी महाविद्यालयात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत घालवलेले क्षण, कठीण प्रसंग, यशस्वी आणि मिळवलेले सहकारी बांधव कायम स्मरणात राहतील. मी संस्था, सहकारी, मित्रपरिवार व कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, वेगवेगळ्या क्षेत्रातील संस्था, संघटना, पाहुणे व मित्रपरिवारांकडूून सत्कार करण्यात आला. डॉ. रविंद्र गायकवाड, प्रा. गणपत बेलकोने, प्रा. जवाहर चनशेट्टी, प्रा. सुजित चिकुंद्रे, प्रा. रोहन हराळकर, प्रा. प्रकाश चव्हाण, प्रा. गजानन उपासे, विनय इंगळे, श्रीकांत शिंदे, अवधूत गुरव आदींनी पुढाकार घेतला. या सोहळ्याचे प्रस्ताविक प्राचार्य गोविंद इंगोले यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषेराव राठोड व प्रा. किसन माने तर आभार प्रा. वर्षा हुलगुंडे यांनी मानले. यावेळी कर्नाटक राज्यातील नातेवाईक, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.