मुरूम (प्रतिनिधी) - येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (ता.2) रोजी परिसर स्वच्छता अभियान सप्ताहाचा समारोप करण्यात आला. 

दि. 25 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर पर्यंत विविध भागांची व ठिकाणांची स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांसोबत घेऊन करण्यात आली.  प्रारंभी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. महेश मोटे, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. अरुण बावा, डॉ. नरसिंग कदम, डॉ. संध्या डांगे, डॉ. सोमनाथ बिरादार, अशोक कलशेट्टी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शिला स्वामी, प्रा. अशोक बावगे, डॉ. विलास खडके, डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. अनिल हेबळे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, प्रा. नाना बेंडकाळे, सुरेखा पाटील, मल्लू स्वामी, दत्तू गडवे, राजानंद स्वामी, लालअहमद जेवळे, श्रावण कोकणे, इसाली चाऊस, महेश कांबळे आदींनी पुढाकार घेऊन परिसराची स्वच्छता केला.  


 
Top