नळदुर्ग (प्रतिनिधी)- पुन्हा एकदा तुळजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणुन राणाजगजितसिंह पाटील हेच निवडुन यावेत यासाठी नळदुर्ग शहर भाजप व भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिर ते तुळजापुर येथील आई तुळजाभवानीच्या मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन आई तुळजाभवानीला साकडे घातले.

विधानसभा निवडणुक जाहीर झाली असुन तुळजापुर विधानसभा मतदार संघातुन विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हेच महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांच्या विजयासाठी नळदुर्ग येथील भाजप व भाजयुमो चे पदाधिकारी व कार्यकर्ते दि. 17 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिर ते तुळजापुर येथील आई तुळजाभवानीच्या मंदिरापर्यंत पाई चालत जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आई तुळजाभवानीला साकडे घातले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे विकासरत्न असुन गेल्या पाच वर्षात त्यांनी तुळजापुर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास करून या मतदार संघात विकासाची गंगा आणली आहे त्यामुळे पुन्हा एकदा या मतदार संघाचे आमदार म्हणुन राणा जगजितसिंह पाटील हेच विजयी व्हावेत यासाठी आम्ही पाई चालत जाऊन आई तुळजाभवानीला साकडे घातले असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

पायी चालत जाणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये, श्रमिक पोतदार, गणेश मोरडे, विजय ठाकुर, धीमाजी घुगे, संजय बताले,पद्माकर घोडके,अजय दासकर, राहुल जाधव, विकी डुकरे, अक्षय भोई, आकाश ठाकुर, रोहीत डुकरे, आकाश डुकरे, किरण दुस्सा, सुहास पुराणिक, बबन चौधरी, अमोल दासकर, अजय देशपांडे, शिवाजी सुरवसे व सुदर्शन पुराणिक यांचा समावेश आहे.


 
Top