तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सतरा  वर्षांपासूनचा रोजगार ग्रामसेवकांचा रोजगारांचा प्रश्न योगेश केदार यांनी मार्गी लावल्याबद्दल धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा ग्रामरोजगार सेवकांकडून तुळजापूरात भव्य सत्कार करण्यात आला.

या सत्कारास उत्तर देताना केदार म्हणाले कि तुमचा सतरा वर्षांपासूनचा अधिकृत्त मानधनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावु शकलो. यामुळे मला सर्वाधिक आनंद झाल्याचे सांगुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यामुळे उपमुखमंञी  देवेंद्र फडणवीस, उपमुखमंञी अजित पवार  यांच्या सहकार्यामुळेच हे प्रश्न मार्गी लावु शकलो असे यावेळी सांगितले. रोजगार ग्रामसेवक पदाधिकारी म्हणाले.तुम्ही  विधानसभा निवडणुक लढवली तर  तुमच्या मागे उभे टाकु असे सांगुन लोकप्रतिनिधी असा असावा असे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यातील सहा जिल्हयतील रोजगार ग्रामसेवक उपस्थित होते.

 
Top