वाशी (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी विद्यालय,वाशी येथील इयत्ता 9 वी ,10 वी वर्गाला मराठी विषयाचे अध्यापन करीत असलेले श्रीधर धारकर यांनी शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. श्रीधर धारकर यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन टी.पी. शिनगारे, शालेय समितीचे उपाध्यक्ष संदीप सुंदरराव कवडे, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. गाढवे, पर्यवेक्षक बी.एम.सावंत सर्व पालक,विद्यार्थी,पत्रकार शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.