भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व विभागीय मंडळ लातूरच्या बोर्ड मेंबर सदस्यपदी गुरुदेव दत्त हायस्कूलचे गुणवंत शिक्षक, माजी नगरसेवक किरण रामहरी जाधव यांची निवड झालेली आहे. या निमित्ताने गुरुदेव दत्त हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला. निवड झाल्याबद्दल गुरुदेव दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव, संस्थेचे सचिव श्रीमंत देशमुख तसेच संस्था अध्यक्ष व्यंकट मोटे व सर्व संचालक मंडळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यां तर्फे जाधव यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शहराचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वतीने त्यांचा अभिनंदन करण्यात आला.


 
Top