धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही कामासाठी कमीत कमी 500 रूपयांचा बाँड वापरणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी 100 रूपयांच्या बाँड परवानगी होती. परंतु 14 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे भागीदारी पत्रक, कामाचे कंत्राट, शपथपत्र आदी कामासाठी आता 500 रूपयांचा बाँड लोकांना घ्यावा लागणार आहे. 

वाढत्या महागाईमुळे लोक अगोदरच त्रस्त असताना त्यात पुन्हा बाँडची भर पडली आहे. कोणत्याही प्रकरणातील शपथपत्र 500 रूपयांच्या बाँडवर द्यावे लागणार आहे. त्याप्रमाणे जमिनीचा मावेजा संदर्भातील प्रकरणे, भागीदारी पत्रक, कामाचे कंत्राट आदीसाठी 500 रूपयांचा बाँड वापरा लागणर आहे. सरकारच्या विविध योजनेसाठी अनेक कागदपत्र मागितले जातात. यामध्ये शपथपत्र हे सक्तीचे असते. त्यामुळे सर्व सामान्य लोकांना 500 रूपयांचा खर्च जास्त करावा लागणार आहे. 

 
Top