तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण डाक सेवक अनुष्का विधाते यांची अखिल भारतीय बॅडमिंटन पोस्टल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तेर येथील उप डाकपाल कार्यालयात सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.याठिकाणी तेर येथील ग्रामीण डाक सेवक अनुष्का विधाते हीची कनाऺटक राज्यातील म्हैसूर येथे होणाऱ्या १० नोव्हेंबर पासून होणाऱ्या अखिल भारतीय पोस्टल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल तेर येथील उप डाकपाल कार्यालयात उपडाकपाल मनोज डोबोले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कल्याण माळी, पद्मावती कज्जेवाड, स्नेहल कांबळे, गोपाळ लाकाळ,जाहिदा शेख, गणेश उंबरे,बापू चंदनशिवे, पंकज कदम,अमन शेख, सोमनाथ माळी, नरहरी बडवे आदी उपस्थित होते.

 
Top