धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय न्यायदेवतेचे नवीन स्वरूप संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारे असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश यू. व्ही. चौधरी यांनी केले.
डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, धाराशिव येथे भारतीय न्यायदेवतेची नवीन स्वरूपातील प्रतिमा, अत्याधूनिक कॉम्प्युटर लॅब आणि वॉटर प्युरिफायर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी चौधरी बोलत होते.
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कौस्तुभ गावडे, ॲड. हितेश रानिंगा, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ. कायला कृष्ण मूर्ती हे विचार मंचावर उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कायला कृष्ण मूर्ती यांनी केले. कौस्तुभ गावडे, डॉ.जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, शुभांगी गावडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता कोल्हे यांनी व आभार प्रदर्शन डॉ.संजय आंबेकर यांनी केले. या प्रसंगी डॉ. व्ही. जी. शिंदे, डॉ. नितिन कुंभार, डॉ. इक्बाल शाह, प्रा. अजित शिंदे, प्रा.कैलाश शिकारे, डॉ पौर्णिमा तापडिया, प्रा. सिद्दिकी, श्रीमती गरड, ग्रंथपाल गायकवाड, कार्यालयीन कर्मचारी संभाजी बागल, संजय क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, बाशिर अत्तार, राहूल ओव्हाळ, आकाश कवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.