धाराशिव (प्रतिनिधी)- मुलींसाठी सुरू असलेल्या “निर्भय बनो“ मोफत कराटे प्रशिक्षण शिबीरात ॲड वैशाली देशमुख यांनी शिबिरातील मुलींना गुड टच बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केले. सर्व चांगल्या वाईट घटना आई वडील यांना अगदी मोकळेपणाने सांगण्यात कसलाही संकोच वाटू देऊ नका कारण तेच तुमचे सर्वात जवळचे हितचिंतक व मित्रही असतात असे आवाहन केले. यासोबत कायदेविषयक माहिती आणि हक्काबाबतही माहिती दिली. याप्रसंगी मुलींनी विचारलेल्या प्रश्नांचीही समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. यावेळी प्रशिक्षण शिबिराचे संयोजक युवराज नळे, प्रविण गडदे उपस्थित होते.