परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील भौतिकशास्त्र विषयात डॉ.महेश कुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी श्रीपाद आतकरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथे आयोजित केलेल्याअविष्कार मध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या तीन विद्यापीठा मध्ये भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. अजय क्षीरसागर यांनी या तीनही विद्यापीठांमध्ये पेठ परीक्षेत प्राविण्य मिळाल्याबद्दल आणि अविष्कारचे समन्वयक डॉ अतुल हुंबे यांनी अविष्कार मध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभा प्रसंगी प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, आविष्कारचे समन्वयक डॉ.अतुल हुंबे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख प्रा.डॉ.संतोष काळे प्रा.तानाजी फरतडे प्रा.किशोर सावंत सौ कोंढारेआधी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कौतुक केले.ते म्हणाले की महाविद्यालयात गुणात्मक शिक्षण मिळत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःची वेगळी ओळख करण्यास वाव मिळत आहे .पारंपारिक शिक्षणाबरोबर संशोधनातही विद्यार्थी प्राविण्य निर्माण करत आहे याचा अभिमान वाटत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून महाविद्यालयात गुणात्मक शिक्षण घ्यावे संशोधन केंद्र असल्याने उत्कृष्ट संशोधन करून विद्यापीठांमध्ये या महाविद्यालयाचे नाव करावे ते करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी करून आभार मानले.