भूम (प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज सकाळी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे दर्शन घेऊन त्यानंतर दि.24 ऑक्टोबर रोजी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भूम येथील तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी महायुतीतील भाजप, अजित पवार गट, घटक पक्षातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गाजावाजा न करता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी धनंजय सावंत, केशव सावंत, गिरीराज सावंत, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, संजय गाढवे, अण्णासाहेब देशमुख, बिभीषण खामकर, शिवाजी भोईटे, महादेव अंधारे, सुभाष मोरे, विशाल ढगे, प्रवीण देशमुख, समाधान सातव, निलेश चव्हाण, युवराज हुंबे, दत्ता साळुंके, गौतम लटके, संदीप खरसडे, रामकिसन गव्हाणे, वैजनाथ मह्माने, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.