तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटता सुटेनासा झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वथता पसरली आहे. महायुतीतील भाजप उमेदवाराने प्रचार ही सुरु केला आहे. त्यांचे मिञ पक्ष माञ अद्याप प्रचारात उतरले नसल्याचे दिसुन येत आहे. सध्या तरी काँग्रेसकडून माजी मंञी मधुकर चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड. धिरज पाटील, विश्वास शिंदे बरोबरच अशोक जगदाळे यांच्या नावाची चर्चा होत आहे. माञ उमेदवारी बाबतीत प्रचंड गुप्तता पाळल्याचे दिसुन येत आहे. लोकसभेला महायुतीने उमेदवार बाबतीत जी चुक केली ती चुक विधानसभेला महाविकास आघाडी करीत असल्याची चर्चा आहे.
या विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मोठा संघर्ष सुरु आहे. यात मधुकर चव्हाणा यांना डावलले तर बंडखोरीहोण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या मतदारसंघाचा निर्णय घेताना काँग्रेसच्या स्थानिक व प्रदेश नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. काँग्रेस उमेदवारावरच या निवडणुकीची लढत अवलंबून असणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीने उमेदवार जाहीर करुन बाजी मारली असुन प्रचार ही सुरु केला आहे. दोन दिवसात काँग्रेस उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती काँग्रेसचे पक्ष निरक्षक इंद्राज गुर्जर यांनी दिली.