धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी घोषित केला आहे.भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेप्रमाणे लोकप्रतिनीधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 अ अन्वये निवडणूक पत्रकांच्या व भित्तीपत्रकांच्या छपाईबाबत निर्बंध घातलेले आहेत.
छपाईची कामे करणाऱ्या प्रेसधारकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे (उपचिटणीस शाखा) नमुण्यात तात्काळ प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहे.या आदेशानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कोणीही प्रेसधारक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र करुन दिल्याशिवाय विधानसभा निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांच्याकरिता छपाई करू नये.प्रतिज्ञापत्र सदर न करता कोणी प्रेसधारक छपाई करत असल्यास त्याच्याविरुद्ध वरील अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.