धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूकाचे निकाल घोषित होईपर्यंत परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर निर्बंध लागू केले आहेत.याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहे.
प्रत्येक शस्त्र परवानाधारकास नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकुण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती,दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी/कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी/कर्मचारी यांना यामधून सुट देण्यात आली आहे.इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर या आदेशाने बंदी घातली आहे.हा आदेश जिल्ह्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत अंमलात राहील.