भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील श्री रेणुकामाता व प्रति तुळजाभवानी देवीचे देवीच्या नवरात्र महोत्सवाचे 3 ऑक्टोबर पासून मोठ्या उत्साहात गट स्थापनेने प्रारंभ होणार आहे. नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची सर्व प्रकारची सोय सुविधा पुरवण्यासाठी मंदिर देवस्थान यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली. असून देवीच्या मंदिराची रंगरंगोटी काम अंतिम टप्प्यात आहे.
3 ऑक्टोंबर अश्विनी शुद्ध प्रतिपदेस सकाळी घटस्थापना व रात्री आठ वाजता देवीच्या पंचोपचार महापूजा, महाआरतीने घटस्थापनेने श्री रेणुकामाता व प्रति तुळजापूर देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. हे मंदिर खूप जुन्या काळातील मंदिर असून या मंदिराची भूम तालुक्यात प्रसिद्धी असल्याने भूम तालुक्यातून व शहरातून देवीच्या दर्शनासाठी नवरात्र काळात भाविक भक्त येत असतात. येणाऱ्या भाविक भक्तांची सोय व्हावी यासाठी मंदिराचे पुजारी धनंजय सुपेकर यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यामध्ये मंदिराच्या परिसर स्वच्छ करणे मंदिरावर रंगरंगोटीच्या मंदिरातील गाभाऱ्यातील स्वच्छ करणे मंदिरावर, मंदिर परिसरामध्ये आकर्षित अशी विद्युत रोषणाई अशा विविध कामे लगबगिने करण्यात येत आहेत. नवरात्र काळात भाविक दर्शनासाठी गर्दी असते गावातील व तालुक्यातील भाविक घट स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या पासूनच गर्दी करतात. श्री रेणुका माता व प्रति तुळजापूर देवीच्या मंदिराला आकर्षित अशी विद्युत घोषणाही करण्यात येत आहे मंदिराच्या शिखरावर तसेच पायऱ्यावर मंदिर परिसरामध्ये मंदिर परिसराच्या गाभाऱ्यामध्ये स्वच्छता केल्याने मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण होत असते नवरात्र काळामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर पुजाऱ्यांकडून दर्शन रांगेचे व्यवस्था, भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात करण्यात येत असते. असे श्री रेणुकामाता व प्रति तुळजापूर मंदिराचे पुजारी धनंजय सुपेकर यांनी सांगितले.