तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदिर साठी शब्द तुपाचे लाडू पुरवठा करण्याबाबत निविदा अर्ज मागवला होता. त्यामध्ये अनेक जाचक अटी, शर्ती असल्याने स्थानिक महिला बचत गट यात सहभागी होवु शकत नाहीत. तरी जाचक अटी शर्ती रद्द करावेत अन्यथा महिला बचतगट महासंघ उपोषण आंदोलन करेल असा इशारा वजा निवेदन श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि, तुळजाभवानी मंदिर साठी शब्द तुपाचे लाडू पुरवठा करण्याबाबत निविदा अर्ज मागवला होता. त्यामध्ये अनेक जाचक अटी शर्ती असल्याने याचा लाभ मोठ्या संस्थाना लाभदायक ठरणारे आहेत. जाचक अटी शर्तीमुळे महिला बचत गट याप्रक्रियेत सहभागी होवू शकणार नाहीत. यात महिला बचत गट कशा प्रकारे बाजूला होतील याची खबरदारी प्रशासनाने जाचक अटी शर्ती घालुन केल्याचे दिसत आहे. यामुळे निविदामुळे कार्पोरेट क्षेत्रातील व्यक्तीं या टेंडर मध्ये बसू शकतात. या निवेदन मधून लोकल ही संकल्पना बाजूला होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारीनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर वरील निविदा जाचक अटी रद्द करून फेर निविदा काढण्यात यावी असे निवेदन सुप्रिया सुळे महिला संस्थेच्या मनिषा पाटील, नवनिर्मिती प्रेरणा संस्थेच्या मीना सोमाजी, कल्पराज महिला बचत गटाच्या कल्पना गायकवाड यांनी दिले.