धाराशिव (प्रतिनिधी) - दिल्ली येथील कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघाच्यावतीने दर वर्षी दिला जाणार नॅशनल उर्दू टीचर पुरस्कार धाराशिव शहरातील गुलशन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शबनम मैनोद्दिन सय्यद यांना जाहीर करण्यात आला आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक क्षेत्रातील बदलाची माहिती व्हावी व त्यांनी त्या पद्धतीचे शिक्षण अंगीकृत करावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी नॅशनल उर्दू टीचर पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार शबनम सय्यद यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दि.3 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सय्यद याचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

 
Top