धाराशिव (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के यांची निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला.

दत्ताभाऊ सोनटक्के यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ते तालुकाध्यक्षपदापासून काम करीत पक्षाची ध्येयधोरणे व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच समाजकारण करताना अनेक गरजू निराधार यांची देखील कामे करून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्याची पक्षाने दखल घेऊन त्याची भारतीय जनता पक्ष ओबीसी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब शिरसागर, प्रदीप शिंदे, दत्ताभाऊ राजमाने, गुलचंद व्यवहारे, इंद्रजीत देवकते, ननवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top