धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील डॉ.योगिता मुकुंदराव चौधरी (डॉ.सौ.योगिता स्वप्नील शिंदे) 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी वर्ग आ निवड परीक्षेत 156 गुण घेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. शासनाने त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, शिराढोन ता.कळंब जिल्हा धाराशिव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केल्याचे आदेश दिले आहेत.