तुळजापूर (प्रतिनिधी)- शेळगाव येथील न्यायाधिश सौ. हेमा अरविंद पाटील (वडणे) यांच्या मातोश्री स्व. जनाबाई हरीदास वडणे वय 80 यांचे दि. 25 सप्टेंबर रोजी निधन झाले.

जनाबाई यांनी दहा वर्षांपूर्वीच देहदनाचा फॉर्म  सोलापूर येथे भरून तसे मृत्युपत्र करून ठेवून समाजापुढे एक आदर्श  निर्माण केला होता. मरणानंतरही आपला देह समाजाच्या कामी यावा या हेतूने त्यांनी  त्या काळात देहदान करण्याचा संकल्प जाहीर केला. यापूर्वी त्यांच्या घराण्यात असे कोणीही केलेले नाही कीवा परंपरा पण नव्हती परंतु जनाबाईंनी आपल्या पुडच्या पिढीमध्ये समाजभान जागृत ठेवण्याचा संदेश आपल्या देहदनानातून दिला.  या संकल्पानुसार जनाबाई यांचे निधन झाल्यानंतर  त्यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे  दान करण्यात आला. जावई अरविंद पाटील, कन्या न्यायाधीश हेमा पाटील व दुसऱ्या कन्या मीना गायकवाड व धनंजय गायकवाड आणि जिवनकला सरडे  तसेच मुलगा जगदीश वडणे व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकुरकर उपस्थित होत्या. यावेळी अनेकांनी स्वर्गीय जनाबाई यांच्या सामाजिक बांधिलकी बद्दल आणि धाडसी निर्णयाबद्दल कौतुक केले.


जीवन कितीही सुंदर असले तरी, मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे माणसाने जिवंतपणी परोपकाराची भावना जोपासून मनुष्य धर्माचे पालन केले असले तरी, मरणोपरांत अनेकांना जीवन देण्यासाठी देह खर्ची घालणे, ही अनुभूती वेगळीच आहे. आज अनेक रुग्णांना मानवी शरिराच्या अवयवांची आवश्यकता असते. परंतु कधी आर्थिक परिस्थिती तर कधी उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांचे वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने मरणोपरांत देहाचे दान केल्यास निश्चितच मानवी जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. देहदान हे श्रेष्ठदान आहे, असे प्रतिपादन देहदाता जनाबाई वडने यांच्या कन्या न्यायाधिश सौ. हेमा पाटील यांनी केले.

 
Top