धाराशिव (प्रतिनिधी)- गुरूवार दि. 24 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात सुभाष मुरलीधर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोबत कोणत्याही पक्षाचा एबी फार्म जोडला नाही. दरम्यान आज विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी 21 जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गुरूवार पर्यंत एकूण 79 उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. उमेदवारी अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये ॲड. व्यंकट गुंड, ॲड. नितीन भोसले, नितीन लांडगे, मयुर काकडे, नवनाथ दुधाळ आदींचा समावेश आहे. 


आमदार ज्ञानराज चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज गुरुवार दि.24 ऑक्टोबर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, उमरगा यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची उपस्थिती होती.


 
Top