धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे निवडणूक विषयक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहे. निवडणूक विषयक कामे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दक्षतेने आणि काळजीपूर्वक करण्यात यावी. असे निर्देश निवडणूक निरीक्षक (खर्च) अलुरु व्यंकट राव यांनी दिले.

दि. 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक खर्च विषयक संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत राव बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ओम्बासे म्हणाले,जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विविध पथके गठीत करण्यात आली आहे.निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यात आंतरराज्य सीमा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहे. 

या बैठकीला उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले,जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे,जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक चिन्मय दास ,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे व खर्च विषयक संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. निवडणूकविषयक तयारीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी निवडणूकविषयक माहितीचे सादरीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी इगे यांनी दिली.


 
Top