धाराशिव (प्रतिनिधी)- वरिष्ठ पातळीवर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सोडण्याची अंतिम चर्चा सुरू आहे. उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सुटल्यास पक्षातीलच उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल. अन्य पक्षातून आलेल्यांना पक्षाची उमेदवारी दिली जाणार नाही. अशा  प्रकाराचा ठराव राज्य पातळीवर पाठविलेला आहे अशी माहिती आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, सचिन तावडे, अतुल जगताप, खलील पठाण, बालाजी शिंदे, नंदकुमार गवारे आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना आमदार काळे यांनी आपण उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे असेही स्पष्ट केले. 21 टीएमसी पाणी व अन्य विकास कामासाठी आपण रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. याभागातील शैक्षणिक, सामाजिक प्रश्न घेवून आजपर्यंत लढत आलोय. 


जरांगे यांची भेट

यावेळी बोलताना आमदार विक्रम काळे यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून मनोज जरांगे पाटील यांची नियुक्तीच भेट घेतली आहे. ते उमेदवार उभे करतील असे वाटत नाही असेही आमदार काळे यांनी सांगितले. 

 
Top