धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकारमुळे हक्काचे पाणी जिल्ह्यात येण्यासाठी विलंब झाला असल्याचा आरोप आमदार, खासदारांनी केले आहेत. महाविकास आघाडी सत्ता असताना कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे हक्काचे पाणी आणण्यासाठी आपण काय केले? असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात पुर्ण क्षमतेने कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम चालू होते. पूर्ण निधी दिला जाता होता. त्याप्रमाणे काम केले असते तर 2023 मध्येच पाणी येणे अपेक्षित होते. मात्र महायुती सरकारच्या काळात वेळेवर पैसे उपलब्ध न केल्याने कामाला गती आली नाही असे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून महायुतीच्या सरकारवर टिका केली होती. पालकमंत्री तानाजी सावंत, भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी योग्य पध्दतीने पाठपुरावा केल्यामुळेच या डिसेंबर अखेर 23.66 टीएमसी पैकी 7 टीएमसी पाणी पाणी येणाऱ्या असल्याची माहिती सुरज साळुंके यांनी पत्रकारांना दिली. साळुंके पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामुळेच या कामाला गती असल्याचेही सांगितले.