धाराशिव (प्रतिनिधी)- हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक शिवाजी रामचंद्र जाधव यांच्या पत्नी कै. प्रयागबाई शिवाजी जाधव यांचे रविवार दि.29 सप्टेंबर रात्री 10.30 वा.अल्पशा आजाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे निधन झाले. त्या 76 वर्षाच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता चिलवडी येथे झाला. त्यांच्या पश्चात पती स्वातंत्र्यसैनिक शिवाजी जाधव, मुलगा, एक मुलगी, सुन, नातू व नातसून असा परिवार आहे. साखर कामगार नेते नंदकुमार जाधव यांच्या मातोश्री होत.