तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील मंगरुळ येथील सन अँण्ड ओशन चे संस्थापक युवा उधोजक राजकुमार धुरगुडे पाटील यांची पुणे ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अर्थात 'एम च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. 26) पुण्यातील हॉटेल शेरेटन अँड या ठिकाणी होवुन यात संस्थेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, सचिव समीर पाथरे, सहसचिव वैभव काशीकर यांच्यासह अकरा सभासदांची संचालकांची बिनविरोध निवड झाली. या असोसिएशनचे निवडणूक अधिकारी शिवाजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अंतिम छाननीनंतर अकरा अर्ज वैध ठरले. ज्यात मागील संचालक मंडळांमधील 10, तर एका नव्या सदस्याची निवड करण्यात आली. निवडून आलेले अकरा सदस्य पुढील प्रमाणे राजकुमार धुरगुडे पाटील, प्रदीप कोठावदे, समीर पाथरे, वैभव काशीकर, सर्जेराव शिसोदे, रवींद्र अग्रवाल, पुणे ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या असोसिएशनच्या
संचालक मंडळ निवडणुकीत राजकुमार धुरगुडे पाटील यांचे पॅनेल विजयी ठरल्याने धुरगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजीव चौधरी, प्रकाश औताडे, प्रशांत शिंदे, अनिल हवल आणि कमलजित सिंग. अदि मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना संस्थेचे नुतन अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील म्हणाले कि, आज 'एम'ने तयार केलेला डेटा केंद्र सरकारने मान्य केला असून त्या आधारेच आठ बायोस्टिम्युलंट उत्पादनांना एफसीओमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याचा फायदा देशातील सर्व कृषी निविष्ठा उत्पादकांना होणार असून, एम असोसिएशनने यासाठी केलेले कष्ट हे देशातील सर्व शेतकऱ्यांना देखील उपयुक्त ठरणार आहेत. एमने देशातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सदर उत्पादनांचा डेटा सर्वांसाठी लागू करण्यासाठी सहमती दर्शवली. शेवटी पुन्हा निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. या सभेमध्ये संस्थेचे सचिव समीर पाथरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.