धाराशीव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कराटे असोशिएशन मुंबई द्वारा राज्यस्तरीय कराटे स्पर्धा शिवछत्रपती म्हाळुंगे बालेवाडी, पूणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा 28 व 29 सप्टेंबर 24 रोजी संपन्न झाल्या.

राज्यभरातील 14, 17 ,19 वर्ष वयोगटातील मुला, मुलींनी सदरील स्पर्धेत सहभाग नोंदवुन स्पर्धा यशस्वी केली.  राज्य संघटनेचे सिहांन योगेश चव्हाण व जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रशिक्षक लहु पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली सेन्साई मनोज पतंगे यांनी खेळाडुंना प्रशिक्षीत करुण स्पर्धकांना सहभागी करूण स्पर्धेत यश संपादन केले. गोल्ड मेडल प्राप्त दोन खेळाडुंना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे.

यशस्वी खेळाडुंनी काता, कुमीते प्रकारात प्राविण्य प्राप्त केले. त्यात मुलांत सतेज संजय चव्हाण (गोल्ड अँड ब्राँझ मेडल), हर्षदा विष्णू राजगुरू (गोल्ड मेडल), आदित्य किर्तिरत्न बनसोडे, रमणी प्रवीण म्हेत्रे, यांनी सिल्व्हर मेडल प्राप्त केले. गजानन राजेंद्र बनाळे, वेदश्री अशीष जोशी, शर्वरी माणिक सिंगनाथ, तेजस खराटे आदींचा समावेश आहे.


 
Top