धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (पोलीस) आर.एस.बेलवंशी आज जिल्ह्यात दाखल झाले आहे. बेलवंशी यांचा मुक्काम तुळजापूर येथील विश्रामगृहातील रायगड सूट येथे राहणार आहे. बेलवंशी यांच्या आगमनप्रसंगी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.