धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात आज 28 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी 66 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या 72 इच्छुक उमेदवारांनी 131 नामनिर्देशनपत्राची खरेदी केली.

240 - उमरगा विधानसभा मतदारसंघात आज दिग्विजय शिंदे (अपक्ष),ज्ञानराज चौगुले (शिवसेना शिंदे गट),अजयकुमार देडे ( शिवसेना उबाठा) यांनी दोन अर्ज, प्रवीण स्वामी (शिवसेना उबाठा),सातलिंग स्वामी (प्रहार जनशक्ती पक्ष),सचिन माने (अपक्ष),संदीप कडबू (रिपाई आठवले) आणि विलास व्हटकर (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या 17 उमेदवारांनी 22 अर्ज खरेदी केले.

241- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अमीर इब्राहिम शेख (समाजवादी पार्टी व अपक्ष) म्हणून दोन अर्ज,सत्यवान सुरवसे (अपक्ष),मनोज जाधव (अपक्ष),स्नेहा सोनकाटे (वंचित बहुजन आघाडी),सज्जन साळुंखे (अपक्ष) म्हणून दोन अर्ज,कुलदीप उर्फ धीरज पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),अनिता साळुंखे (अपक्ष) म्हणून दोन अर्ज,नवनाथ उपळेकर (अपक्ष), अशोक जगदाळे (अपक्ष) म्हणून 2 अर्ज, ऍड.पूजा जगदाळे (अपक्ष),तानाजी पिंपळे (अपक्ष),व्यंकट गुंड (अपक्ष), संतोष दूधभाते (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पक्ष), काकासाहेब राठोड (अपक्ष) यांनी दोन अर्ज,तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा महंत (अपक्ष),योगेश केदार (अपक्ष),भैय्यासाहेब नागटिळे (अपक्ष) आणि प्रल्हाद सगर (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.11 इच्छुक उमेदवारांनी 30 अर्जाची खरेदी केली.

242 - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात आज कैलास गाडगे- पाटील (शिवसेना ऊबाठा),शुभांगी पाटील (शिवसेना उबाठा) यांनी दोन अर्ज, ऍड.विश्वजीत शिंदे (अपक्ष),पांडुरंग कुंभार (अपक्ष) यांनी तीन अर्ज,ज्ञानदेव रणदिवे (अपक्ष),धैर्यशील सस्ते (अपक्ष) यांनी दोन अर्ज,नवनाथ दुधाळ (अपक्ष) व ऍड. प्रवीण डिकले (वंचित बहुजन आघाडी) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या 28 अर्जदारांनी 52 अर्जाची खरेदी केली. 

243- परंडा विधानसभा मतदारसंघात प्रवीण रणबागुल (वंचित बहुजन आघाडी), मारुती कारकर (अपक्ष),बंशी डोळे (अपक्ष),महादेव लोखंडे (बहुजन समाज पार्टी) दोन अर्ज,रणजीत पाटील (शिवसेना उवाठा) दोन अर्ज,विश्वजीत पाटील शिवसेना (उबाठा) तीन अर्ज,राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट), वैशाली मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट),आसिफ जमादार (अपक्ष), लक्ष्मीकांत आडुळे (अपक्ष), प्रशांत चेडे (अपक्ष),निळकंठ कोरे (अपक्ष) राहुल घुले (राष्ट्रीय समाज पक्ष),शाहजहान शेख (बहुजन महापार्टी),नाना मदने (राष्ट्रीय समाज पक्ष),गुरुदास कांबळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केले.16 निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 27 अर्जाची खरेदी केली.

 
Top