धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आणि धाराशिव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या सहकार्याने  येथील स्व बी. डी. देशमुख सर क्रीडा नगरीत आयोजित 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटनाने प्रारंभ झाला आहे. 

स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी अंकुश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  व्यासपीठावर विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी  राजकुमार दहीहांडे, व्हॉलीबॉल संघटनेचे लातूर विभागीय सचिव दत्ता सोमवंशी, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे मनथप्पा पाळणे, सचिव सचिन पाळणे, कुस्तीगीर संघटनेचे नागनाथ देशमुख, राजर्षी शाहु शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकलाताई  घोगरे, उपाध्यक्ष अविनाश देशमुख, कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, प्राचार्य पी एन पाटील, विक्रांत पाटील, निवड समिती सदस्य शिवाजी पाटील, संदीप उईके, प्रज्ञा वरेकर आदींसह व्हॉलीबॉलपटू, मार्गदर्शक, व्यवस्थापक व क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती. 

धाराशिव येथे आयोजित राज्यस्तर शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचा थरार 15 ते 17 ऑक्टोबर धाराशिकराना अनुभवता येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच विक्रम पाटील, लिंबराज बिडवे, महेश पाळणे, शहाबाज पठाण, विठ्ठल कवरे, जब्बार पठाण, तुषार परदेशी, क्रीडा  अधिकारी बी.के.नाईकवाडी, कैलास लटके, अक्षय बिरादार, क्रीडा मार्गदर्शक डिम्पल ठाकरे, शुभांगी रोकडे, धाराशिव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सहसचिव संजय देशमुख, छत्रपती शिवाजी हायस्कुल चे मुख्याध्यापक पी.एन.पाटील आदी प्रयत्न करत आहेत. स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहत खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 
Top