तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील ग्रामपंचायत सारोळा  मध्ये झालेल्या गैरव्यवहार बाबत कुठली ही कार्यवाही होत नसल्याने या प्रकरणाची दखल न घेतल्याने अखेर  सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत समोर  ग्रामपंचायत सदस्याने आत्मदहनाचा प्रयत्न करीत असताना  वेळीच पोलिसाने त्या सदस्याला रोखल्याने  पुढील   अनर्थ टळला. अखेर विस्तार अधिकारी वैरागे यांनी गैरव्यवहाराची 8 ऑक्टोबर 2024 पर्यत या चौकशी करुन   अहवाल सादर केल्यानंतर दोषी अंती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर सदस्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

या आंदोलनात त्रिशाला विनोद पाटील, प्रविण विठ्ठल नागदे, निकीता सुशील धनके, अंबिका उषाकांत मंडोळे ग्रा.प. सदस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोहेका संजय लोखंडे, माळी सह प्रभारी ग्रामसेवक प्रदीप लाटकर उपस्थित होते. यावेळी महिला ग्रामपंचायत सदस्यांनी फोन केला तरीही ग्रामसेवक फोन उचलत नाही. पण महिन्याला पगार माञ उचलतो. या देशात ग्रामपंचायत सदस्यांना किंमत आहे कि नाही असा सवाल करीत ही लोकशाही आहे का हुकमशाही आहे. या पेक्षा हिटलर शाही बरी होती अशी संतप्त भावना अधिकाऱ्यां समोर व्यक्त केली.

 
Top