भूम (प्रतिनिधी)- येथील गुरुदेव दत्त हायस्कूल चा भूम तालुक्यातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबद्दल शाळेला शासनाकडून तीन लाख रुपयाचे बक्षीस देखील मिळाले आहे. जिल्हास्तरीयसाठी निवड झाली आहे.
गुरुदेव दत्त हायस्कूल भूम ने पुन्हा एकदा भूम तालुक्यात यशाचा झेंडा रोवत तालुक्यांमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या शाळेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात भूम येथील श्री गुरुदेव दत्त हायस्कूलने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला आहे. या अभियानात तालुक, जिल्हा विभाग तसेच राज्यस्तर असे मूल्यांकन केले होते. या मूल्यांकनात तालुकास्तर शाळेला प्रथम क्रमांक मिळाला असून शाळेसाठी बक्षीस म्हणून तीन लाख रुपये बक्षीसाची मानकरी शाळा ठरली आहे. या यशाचे भूम तालुक्यातून सर्व स्तरातून प्रशालेचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
या शाळेनी राबवलेले निवडीसाठी विविध उपक्रम नियोजन, प्रशासन, स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, लाडके वर्ग, अध्ययन, विद्यार्थी प्रतिसाद, वर्ग सजावट, स्वच्छता अभियान, महावाचन चळवळ, वकृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, प्लास्टिक मुक्त शाळा, आर्थिक साक्षरता, ही शाळा सतत वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते श्री गुरुदेव दत्त हायस्कूलची निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आमची शाळा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असते. त्यामुळे यावर्षी शासनाकडून आमच्या शाळेला भूम तालुक्यातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत प्रथम क्रमांक मिळाला असून शाळेला तीन लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.
सतीश देशमुख
पर्यवेक्षक गुरुदेव दत्त हायस्कूल भूम.