कळंब (प्रतिनिधी)- उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षण शिबिर दि . 22 संपन्न झाले .
कळंब उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या उपस्थितीत मंगळवार दि . 22 रोजी बैठक शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृह मध्ये उपविभागाचे विभागीय अधिकारी संजय पवार ; कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप कळंब उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या येरमाळा , ढोकी ,शिराढोण, कळंब पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षणाचे धडे देऊ माहिती दिली यावेळी कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना प्रशिक्षणातच देण्यात आल्या आहेत . यावेळी मतदान काळात मतदान केंद्रावर कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार काय आहे हे यावेळी सांगण्यात आले यावेळी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री क्षीरसागर ,शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर , ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . हजारे तसेच कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . मगर श्रीमती पुंडगे , पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जाधव सह 8 पोलीस अधिकारी व 70 पोलीस अंमलदारासह मोठ्या संख्येने यावेळी प्रशिक्षणात सहभागी झाले होते .