धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अंतर्गत विचार विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी नगरसेवक खलील सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीयमंत्री तथा काँग्रेस विचार विभागाच्या अध्यक्ष डॉ. गिरीजा व्यास यांनी ही निवड केली आहे.

काँग्रेस पक्षात विविध महत्त्वाच्या पदांवर काम करीत असताना पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी खलील सय्यद यांनी मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन आजपर्यंत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्या अतिशय प्रामाणिकपणे सांभाळून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली नवी जबाबदारी खलील सय्यद यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीचे काँग्रेस कार्यकर्त्यामधून स्वागत होत आहे.

 
Top