धाराशिव (प्रतिनिधी)- आज श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली.यामध्ये सकाळी 7 वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली.दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम,भवानी सहस्त्रनाम व नवग्रह याचे हवन करण्यात आले. दुपारी 12.15 वाजता पूर्णाहुती करण्यात आली.नंतर परंपरेनुसार कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थान येथे पूर्णाहुती करण्यात आली.श्री गणेश विहारमध्ये हैद्राबाद संस्थानतर्फे अनंत कोंडो व हेमंत कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते.कोल्हापूर संस्थानच्या वतीने प्रतीक प्रवीण प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते.नंतर श्री तुळजाभवानी देवीजींची पाद्य पूजा व आरती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व त्यांच्या पत्नी अस्मिता ओम्बासे यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंद यांनी आशीर्वाद दिले.हा धार्मिक विधी आनंदाने पार पडला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे, तहसीलदार तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने, तहसीलदार (तुळजापूर ) श्री अरविंद बोळंगे,तहसीलदार (धाराशिव) मृणाल जाधव,मंदिर संस्थानचे लेखाधिकारी संतोष बेन्की,सहायक व्यवस्थापक (धार्मिक) सिध्देश्वर इंतुले,जनसंपर्क अधिकारी विश्वास कदम,विश्वास सातपुते, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे,धार्मिक अधिकारी श्री.काटकर, महंत तुकोजी बुवा,महंत वाकोजी बुवा,चिलोजी बुवा यांच्यासह नागेशशास्त्री,नंदीबुवा,राजाराम अंबुलगे,सुनित पाठक,बंडू पाठक, राजन पाठक,राजू प्रयाग, शैलेश पाठक,प्रल्हाद पैठणकर अंनत कांबळे,मयुर कमठाणकर तसेच भोपे,पाळीकर,उपाध्ये व पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.