धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत यावे, यासाठी भाजपच्या वतीने “शक्ती वदंन यात्रा“ उद्या दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रा मध्ये गेली अडीच वर्षापासून अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार पुन्हा सत्तेत यावे, यासाठी दि.05 ऑक्टोबर 2024 रोजी शक्ती वंदन यात्रा पुर्व तयारी बैठक प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे भाजपा बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व प्रमुख पदाधिका-यांच्याश उपस्थीती मध्ये ही बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीस साकडे घालण्यासाठी या शक्ती वदंन यात्रेचे आयोजन केले आहे. दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी सायं 4 वा. प्रतिष्ठान भवन येथून शक्ती वदंन यात्रा सुरुवात करण्यात येणार आहे.
मार्ग-आरंभ- प्रतिष्ठान भवन धाराशिव- छत्रपती शिवाजी महाराज चौक- पोस्ट कॉलनी, बीएसएनएल कॉलनी रोड- समर्थ नगर- पोलीस लाईन कालीका देवी- तेरणा कॉलेज- भवानी नगर- दत्त नगर- राधीका हॉटेल स्वामी समर्थ मंदिर- येडेश्वरी मंदीर- राम नगर- माणिक चौक- उंबरे कोटा- तांबरी विभाग- काळा मारुती चौक हिंगळजमाता मंदिर सांजा वेज गल्ली- माऊली चौक- नेहरु चौक- देशपांडे स्टँड- गणेश नगर- अण्णाभाऊ साठे चौक- धारासुर मंर्दिनी येथे सामारोप या प्रकारे शक्ती वदंन यात्रेचे आयोजन करण्यात आले.