भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम, जिल्हा धाराशिव येथिल करिअर कट्टा या उपक्रम अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या करियर संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी हाताने तयार केलेल्या खण आकाशकंदील,  रबर, खण शोपिस, छोटे खण आकाशकंदील यांच्या स्टॉलचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. बी. चंदनशिव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. शिंदे, विभागीय समन्वयक डॉ. पडवळ, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. तानाजी बोराडे, जिल्हा समन्वयक प्रा. सुतार, तालुका समन्वयक डॉ. खराटे  आणि महाविद्यालयीन समन्वयक डॉ. राजश्री तावरे हे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी करिअर संसदेच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन दिले.

 
Top